नालासोपारा येथील राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. सायंकाळी सहा वाजताची ही घटनाल घडली असून समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षक जनार्दन मेहर,चारुदत्त मेहर यांनी शिट्टी वाजवत या कार चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांच्याकडे दुर्लक्ष करून,कारचे पाठीमागील बंपर तुटले तरी कारचालकाचा भरगाव स्टंट सुरूच होता. जर अचानक समुद्राला भरती आली तर कार सह चालक वाहून जाण्याची प्रक्रीया मद्यधुंद गाडी चालविणाऱ्या लोकांमुळे किनाऱ्यावरील पर्यटकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो.त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.