अर्नाळा येथील आदिवासींच्या घरांवर तोडक कारवाही केल्याच्या निषेधार्थ आज आमदार राजन नाईक यांच्या घरावर आदिवासींनी धडक मोर्चा काढला. 13 मे रोजी महसूल विभागाने बांगलादेशी समजून अर्नाळा येथील आदिवासी आगरी भूमिपुत्रांच्या घरांवर प्रचंड मोठी तोडक कारवाही करीत 100 पेक्षा जास्त नागरिकांना बेघर केले. ही सर्व कारवाही आमदार नाईक आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून महसूल प्रशासनाने केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नालासोपारा पूर्व वाघोली नाका ते नालेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.