अमरावतीच्या चांदुर रेल्वे नगरपरिषद मध्ये आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नम्रता नितीन गवळी यांचा चक्क टांगा गाडीवरून निवडणुकीचा अनोखा प्रचार केला. प्रदूषण टाळावं, तसेच चांदुर रेल्वेची ओळख कायम राहावी यासाठी टांग्यावरून प्रचार करत असल्याची नम्रता गवळी यांनी प्रतिक्रिया दिली.