ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि प्रसिद्ध, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात रविवारी सकाळी दिलखुलास गप्पा रंगल्या आणि दोघांमधील घट्ट मैत्रीचा बंध नजरेत आला ! दोघांनीही एकमेकांची आणि कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली.