नाना पटोले यांनी भाजपमध्ये मोठ्या सत्तासंघर्षाचा अंदाज वर्तवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पदावरून हटवण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुनगंटीवारांच्या काही कृती आणि या गटाचे कार्य फडणवीस व मुख्यमंत्री दोघांनाही ज्ञात असून, भविष्यात या संघर्षाचा मोठा स्फोट होणार असल्याचे पटोलेंनी सूचित केले आहे.