नाना पटोले यांनी दावा केला आहे की भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम केला असून, हे त्यांनी आधीच सांगितले होते. शिवसेनेतील रस्सीखेचीवर भाष्य करताना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत मोठे उलटफेर होतील असे भाकीत केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसची सत्ता हवी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.