नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आकडा राज्यासाठी भूषणावह नसल्याचे त्यांनी म्हटले. सरकारच्या बोथटपणावर बोट ठेवत, अध्यक्षांनी यात हस्तक्षेप करून सरकारला सूचना देण्याची आणि प्रश्नावर योग्य उत्तर देण्याची मागणी पटोले यांनी केली.