नांदेडच्या लोहा तालुक्यातील चोंडी गावातल्या अंगणवाडीला मद्यपींनी आपला अड्डा बनवला आहे. अंगणवाडीच्या आवारात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतोय. गावातील एका जागरुक तरुणाने या घटनेचा व्हिडिओ बनवून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.