नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथे श्री खंडेश्वर देवस्थान जेजुरी प्रतिष्ठान यात्रेला रविवारपासून उत्साहात प्रारंभ झालाय. खंडेश्वराची पालखी मिरवणूक अत्यंत भक्ती भवाने मोठ्या आनंदात पार पडली. अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी अनेक भाविक पालखीच्या समोर झोपतात. त्यानंतर पालखी त्यांना ओलांडून जाण्यासाठी येते. ही जुनी प्रथा आहे. सदर यात्रा सलग पाच दिवस चालत असते. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जायघोशात येथे भंडाऱ्याची उधळण केली जाते. याच यात्रेत शेंडीने बैलगाड्या ओढण्याची जुनी प्रथा आहे.