नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. सकाळ पासूनच आभाळ झाकोळुन आले होते, दुपारच्या सुमारास हदगाव,तामसा , हिमायतनगर भागात पाऊस झाला. जिल्हयात अन्य ठिकाणी देखील पावसाच्या सरी बरसल्या. हदगाव , हिमायतनगर भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला.नांदेड शहरात देखील पावसाने हजेरी लावली.