नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे महादेव काठी यात्रेला सुरुवात झालीये. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेला अनेक वर्षाची परंपरा लाभली आहे. शिखर शिंगणापूर येथून 28 दिवसाचा पायी प्रवास करून पदयात्रा सगरोळी येथे पोहोचली. या संपूर्ण प्रवासात 33 किलो वजनाची काठी खांद्यावर घेऊन वाहिली जाते. शिखर शिंगणापूरहून ही काठी पोहोचल्यानंतर यात्रेला सुरुवात होते.