नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी पाटील कल्याणकर यांनी प्रभाग पाचमधील मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. आमदार कल्याणकरांनी नांदेडमध्ये शिवसेनेचाच महापौर बसेल आणि त्यांचा मुलगा निवडून येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मतदारांनी धनुष्यबाणास दिलेला पाठिंबा विरोधकांना भारी पडेल असेही ते म्हणाले.