नांदेड - हिंगोली महामार्गावर खडकूत पाटीजवळ काल भीषण विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील 1 जण ठार झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली त्यानंतर भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या एक चार चाकी वाहन या दोन्ही दुचाकीवरून गेल्याने अपघाताची भीषणता वाढली आहे. अज्ञात वाहन फरार झाले आहे. आता या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने दुचाकी चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.