नांदेड: नांदेड महानगरपालिकेवर भाजपाने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे बॅनर लागलेले पाहायला मिळाले. राजकारणाच्या आखाड्यातील वस्ताद, मालक अशा आशयाचे नांदेड शहरात सगळीकडे बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेच्या एकूण 81 जागेपैकी 45 जागा जिंकत भाजपाने सत्ता काबीज केली.