नांदेडच्या नायगाव तालुक्यात हळद पिकावर बुरशी आणि करप्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांमुळे हळदीच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन दिले जावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.