नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील या परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.