नांदेड जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आता पिकं माना टाकू लागलीयेत. वार्षिक सरासरीच्या केवळ 19% इतकाच पाऊस झाला आहे. जून महिना कोरडा ठाक गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पण आता पावसाने उघडी पडल्यामुळे पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.