आठ दिवसाच्या खंडानंतर नांदेडमध्ये कालपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाल्याने नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर आलाश आहे. पुरामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.