नांदेडच्या नायगाव शहरातील घरगुती गॅस वितरण व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला. नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौकात नागरिकांनी अचानक रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर फेकून चक्काजाम आंदोलन केले. गॅस बुक करून गॅस मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले होते. या अचानक उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.