नांदेडच्या माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांना शाळेत दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसमोरच्या या गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारींनी चौकशी केली. दारू पिऊन शाळेत आल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.