उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाणीटंचाईची चिन्हे गडद होऊ लागली आहे. नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अहवालानुसार विभागातील चार जिल्ह्याची पाणी साठवणूक स्थिती 64 टक्के एवढी आहे. तर नांदेड जिल्ह्याची साठवनुक स्थिती एप्रिल मध्येच 54 टक्यांवर जाऊन पोहोचली आहे.