नांदेडच्या मालेगावात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मालेगाव येथील शिवशक्ती ज्वेलर्सचे मालक सचिन उडानशिव हे आपले दुकान उघडुन मंदीरात गेले.त्यांच्या वडीलांनी दुकानात सोने- चांदी असलेली बॅग ठेवली आणि ते झाडझुड करत होते. पाळत ठेवुन असलेल्या अज्ञात चोरट्यांने दुकानात ठेवलेली सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला.या बॅगेत अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे दागिने होते. चोरटे वसमत मार्गे दुचाकीवरून वेगान फरार झाले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.