एकीकडे डिझेलची टंचाईने शेतकरी त्रस्त असताना मध्यरात्री 200 लिटरच्या बॅलरमध्ये इंधन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नांदेडच्या लोहा तालुक्यातील वाका गाव परिसरातील नृसिंह पेट्रोल पंपावरचा असल्याचा दावा केला जात आहे. शूटिंग करणाऱ्या व्यक्तीवर पेट्रोल पम्प चालक दादागिरी करीत असून त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे व्हिडिओत उघड झाले आहे. गुत्तेदार किंवा वाळू माफियांवर पेट्रोल पम्प चालक मेहेरबानी करीत असल्याचा सोशल मीडियावर आरोप केला जात आहे.