आजपासून दिवाळी सुरू झाल्याने नंदुरबारच्या बाजारपेठेत आकर्षक असे दिवे आणि मातीच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह वाढला आहे. अनेक रंगाचे दिवे आणि आकाश कंदील आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरले आहेत. आकाश कंदीलांच्या दरात वाढ झाली आहे, दिवे तीन रूपयांपासून तीनशे रुपयांपर्यंतच्या दरात मिळत आहेत. दिव्यांना मोठी मागणी दिसून येत आहे.