नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाच्या सततच्या सरींमुळे पिकांना जीवनदान मिळाल्याने मिरची उत्पादक शेतकरी पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी दोरीच्या साहाय्याने झाडांना आधार देत आहेत.