नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची आवक ५०% नी घटल्याने ऐतिहासिक घसरण झाली आहे. अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील दर घसरल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आवक निम्म्यावर आल्याने, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाहीये, ज्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.