शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सीविरोधात नागरिकांचा संताप वाढला आहे.गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांना तासन् तास उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नसतानाही दिवसाला केवळ २० बुकिंग केल्या जात आहेत.कार्यालय वेळेवर उघडत नसल्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून सुरळीत सेवा देण्याची मागणी केली जात आहे