नंदुरबार शहरातील नागरिकांना आज पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामादरम्यान पाईपलाईन फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आदेश्वर नगर पाण्याच्या टाकीवरून होणारा पुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, पाईपलाईन दुरुस्तीचे काम पालकी कडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.