नंदुरबार जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय असलेला दुग्ध व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत सापडत आहे. दूध व्यवसायासाठी लागणारा चारा आणि खाद्यपदार्थ महागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. सध्या ज्वारीचा चारा सहा हजार रुपये, दादरचा चारा 11 हजार रुपये एकरी, मक्याचा चारा 25 रुपये किलो, तर 60 किलोची ढेपची गोणी 2400 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.