नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून अन्यायकारक निर्णय आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.