नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.