नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने त्याचा फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरालाही बसू लागला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात पालभाज्या, फळभाज्या आणि टोमॅटोसह बहुतांश भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक भाज्यांच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.