नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाने नागरिकांचे हाल सुरू झाले असून उष्णतेचा पारा 42 ते 43 अंश सेल्सअसपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 18 अत्याधुनिक उष्माघात कक्ष उभारण्यात आले आहेत.