नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी चांगलाच उच्छाद मांडला असून या माकडांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. बाजारपेठेतील एका कापडाच्या दुकांना माकड अचानक शिरल्याने चांगलीच धावपळ उडाली. यावेळी खरेदीला आलेले ग्राहक आणि दुकानदार हे जीव मुठीत घेवून लपतांना दिसून आले.मात्र माकड दुकानातील शर्ट पॅन्टवर नजरा टाकून काही काळानंतर दुकानाबाहेर पडले.त्यामुळे माकड कापड खरेदी आले पण त्याला कपडे पसंद पडले नाहीत अशी मजेशीर चर्चा सुरु आहे.