नंदूरबार शहरात पावसाळा तोंडावर आला असताना नंदुरबार नगरपालिकेकडून शहरातील नालेसफाईच्या कामाला वेग देण्यात आला आहे. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबू नये यासाठी पालिकेच्या वतीने आतापासूनच खबरदारी घेतली जात असून, शहरातील एकूण १२ नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या या नाल्यांची सफाई ठेकेदारांच्या माध्यमातून केली जात आहे.