नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कमी दरामुळे आर्थिक संकटात आहेत. कांदा साठवणुकीत खराब होत असल्याने तोटा सहन करत विक्री करावी लागत आहे. किरकोळ बाजारात १२-१५ रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघत नाहीये. सरकारने मदत करावी अशी त्यांची मागणी आहे, अन्यथा कांदा लागवडीबाबत संभ्रम वाढत आहे.