दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबारच्या शहादा येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.