७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्थानक तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. रेल्वे प्रशासनाने देशभक्तीची अनोखी अभिव्यक्ती करत, या मॉडेल स्थानकावर आकर्षक विद्युत रोषणाई केली. नागरिकांसह प्रवाशांसाठी हे दृश्य एक विशेष आकर्षण ठरले असून, ते आपल्या मोबाईलमध्ये टिपले जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आणि देशाबद्दलचा अभिमान या रोषणाईतून व्यक्त होत आहे.