नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांना आता झिप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. जवळपास दोन कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक करून लोकार्पण करण्यात आले. सुरक्षेची पूर्ण तपासणी करून हा झिप लाईन प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून, तोरणमाळच्या सीताखाईवरून अवघ्या २५ ते ३० सेकंदांत दरी पार करण्याचा रोमांचकारी अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे तोरणमाळ पर्यटनाला चालना मिळणार असून, जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार आहे.