होळी सणानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात भोंगऱ्या बाजाराची मोठी धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपली ऐतिहासिक आणि पारंपरिक शाही मिरवणूक अत्यंत उत्साहात काढली. या मिरवणुकीत गावाचे पाटील भीमसिंग पराडके आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी सरदारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला.