नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला अद्याप वंचित असल्याचं चित्र समोर आलं आहे. जानेवारी महिन्यापासून योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा महिलांकडून केला जात असला, तरी तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण माहितेमुळे अनेक लाभार्थ्यांची लाडकी बहीण योजनेची केवायसी रखडल्याचं समोर येत आहे. भर उन्हात महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी गर्दी करत लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून थकीत लाभ देण्याची मागणी केली आहे. आता या वंचित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.