भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये ते पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाबद्दल बोलत असल्याचे ऐकू येत आहे. गोरगरीब जनतेचे भले व्हावे यासाठी दिवसाढवळ्या पैसे वाटप करत असल्याचा त्यांचा संवाद आहे. बहिणीला निवडणुकीत निवडून आणण्यासाठी हे वाटप केल्याचा आरोप असून, टीव्ही नाईन मराठी या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.