नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांचे दोन्ही चिरंजीव आता राजकारणात कार्यरत असल्याने, राणेंना वैयक्तिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे राज्यसभा किंवा लोकसभा सदस्यत्व न देण्याची विनंती केली होती, परंतु भाजपने त्यांना राजकारण सोडण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.