"मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो. ते वक्तव्य चुकीचं होतं आणि त्याबद्दल मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना सांगायचो की मला साहेब म्हणू नका, सेवक म्हणा," अशा शब्दांत नारायण राणेंनी नितेश राणे यांचे कान टोचले. धाराशिव दौऱ्यावर असताना नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.