माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने आता बिहारमध्ये दुकान बंद करावे असे राणे म्हणाले. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या स्थितीशी तुलना करत, विरोधकांनी बिहारच्या निकालातून धडा घेऊन विरोध करणे थांबवावे, असे आवाहन राणे यांनी केले.