गुरू पौर्णिमेचे औचित्य साधत काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी आज रत्नागिरीच्या प्रसिद्ध नाणिजधाम येथे भेट दिली. यावेळी त्यांनी परमपूज्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतले. नाना पटोले यांनी महाराजांकडून जनसेवेसाठी ऊर्जा व आशीर्वाद प्राप्त केले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीदरम्यान त्यांनी नाणिजधामातील उपक्रमांची माहिती घेतली आणि जनतेच्या भल्यासाठी कार्य करत राहण्याचा संकल्प केला.