पुणे जिल्ह्यातील भोर येथील चिमुरडी हत्या प्रकरणात सरकारकडून कुटुंबाला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. कुटुंबाच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील नियुक्त केला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं असून गृह विभागाच्या वतीने आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकार ठामपणे कुटुंबाच्या पाठीशी उभं आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.