नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत सहावा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली आहे. देवगाव येथील शेतकरी माधुरी किशोर बोचरे यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री नर जातीचा, सुमारे पाच ते सहा वर्षे वयाचा बिबट्या अडकला आहे.