नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पैशाचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित उमेदवार व पक्षाविरोधात निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.