नाशिकच्या बागलाण तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे सटाणा परिसरातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कांदा लागवडीवर याचा परिणाम होत असून, कांदा व भाजीपाला पिकांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.